
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर गेली आहे.
पुढची सुनावणी आता 4 मे रोजी होईल. ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निवडणुकांच्या तारखा आणि प्रभाग रचना करण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत, त्याला आव्हान देणाऱ्या
१३ याचिका महाराष्ट्रातील विविध भागातून दाखल केल्या आहेत.