
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
अहमदपूर :- सरपंच ग्रामपंचायत धसवाडी ता.अहमदपूर जि. लातूर अहमदपूर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करणार धसवाडी ता.अहमदपूर येथील ग्रामस्थांनी रस्त्यावर अतिक्रमण करून गटारावर बिनधोकपणे इमारती बांधून रस्त्यावर ये-जा करण्यासाठी रास्तच ठेवला नाही त्यामुळे गावचे स्वरूप अगदी कोंदट, अरुंद झाले आहे .धसवाडी गावातून जाणार रस्ता हा परभणी जिल्ह्याला जोडणारा अतिशय महत्वाचा व मुख्य रस्ता आहे .परंतु ग्रामस्थांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे .त्यामुळे या मार्गाने धावणारी लातूर-गंगाखेड, परभणी बस सेवा बंद झाली आहे .
प्रेमचंद दुर्गे सरपंच ग्रामपंचायत धसवाडी यांनी व नारायण दुर्गे, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती धसवाडी यांनी संबंधित विभागाला प्रत्यक्ष भेटून व पत्रव्यवहार करून रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पाठपुरावा केला व त्यांना गावातील हितचिंतक ग्रामस्थ यांनी सहकार्य केले आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली होती.परंतु ६ फेब्रुवारी २०२२ पासून ग्रामसेवक अनधिकृत गैरहजर असल्याने पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यास विलंब होत आहे .सदरचा गावातील रस्ता क्र.११ असून रस्त्याची एकूण रुंदी १८ मीटर आहे