
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे/बारामती :- नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मुरूम (ता. बारामती) येथे घडली. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वैभव दीपक खरात, हर्षद थोरात व सनी खुडे (रा. तळवणीनगर, मुरूम, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी (दि.२४) रात्री सव्वा बारा वाजता सोमेश्वर कारखाना ते मुरूम रस्त्यावरील विकासनगर येथे ही घटना घडली.
या प्रकरणी मुरूम येथील युवराज नारायण सोनवणे यांनी फिर्याद दिली. या घटनेत त्यांचा आदित्य हा २२ तरूण गंभीर जखमी झाला. पोलिसांच्या माहीती नुसार आदित्य याचे एका मुलीशी गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. या कारणावरून फिर्यादीचा मुलगा व आरोपींमध्ये या पूर्वीही वाद झाला होता. परंतु ते एकमेकांचे नातेवाईक असल्याने तो चर्चेने मिटविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात संबंधित मुलीचा विवाह झाला. तरीही आदित्य व तीच्या मध्ये प्रेमसंबंध चालूच होते.