
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
मुंबई :– देशात काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल पाहता अपेक्षित यश मिळेल नाही. त्यासाठी दिल्ल्लीत मागील आठवड्यात राष्ट्रीय पातळीवर चिंतन बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्यात पाहता काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. मात्र पक्षांर्तगत पदावरून आमदारांची नाराजी असल्याचे उघड आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर सुरू असून या शिबिरात कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे आणि भविष्यातली दिशा ठरवण्यासाठी बैठक झाली. पक्षाची भावी वाटचाल ठरवण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी विविध अशा 6 विषयांवर समित्या स्थापन स्थापन करण्याचा निर्णय झाला.
या नियोजन समितीवर महाराष्ट्रातून 4 जणांचा समावेश झाला आहे. त्यामध्ये अशोक चव्हाण राजकीय समितीचे सदस्य, मुकुल वासनिक हे संघटना समितीचे अध्यक्ष, तर प्रणिती शिंदे अर्थशास्त्र समितीवर तर नाना पटोले शेती समितीवर सदस्य म्हणून निवडले गेले आहेत. चिंतन शिबिरातील या समित्या पक्षाच्या भावी राजकिय नियोजनाची दिशा ठरवणार आहे. याआधी काँग्रेसच्या २५ आमदारांनीही नाराजीचा सूर आळवला होता.
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार स्वपक्षाच्या मंत्र्यांवर नाराज आहेत. या नाराज आमदारांनी काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे काही मंत्री त्यांचे ‘गाऱ्हाणे’ ऐकून घेत नाहीत. दरम्यान काही प्रमाणात का होईना राज्यातील चार नेत्यांची नियोजन समितीवर वर्णी लागल्याने त्यांच्यातील अंतर्गत धुसपूस कमी होईल, असे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.