
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
नवी दिल्ली :- कोरोना विषाणू प्राण्यांमध्येही पसरू शकतो का? तर याचं उत्तर ‘हो’ आहे. गेल्या दोन वर्षांत प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अनेक रिपोर्ट समोर आले. अनेक ठिकाणी वाघ, मांजर यांसारख्या प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं पाहायला मिळालं. पण कोविड-19 हा आजार खरोखरच प्राण्यांना आपला बळी बनवू शकतो का, अशी शंका अनेकांच्या मनात कायम आहे. गुजरातमध्ये अलीकडे झालेल्या एका संशोधनानुसार, हा धोकादायक विषाणू प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. संशोधनात म्हैस, गाय (Cow) आणि कुत्रा (Dog) यांसारख्या प्राण्यांमध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे.
या संक्रमित प्राण्यांपासून हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका कमी आहे, कारण या प्राण्यांमध्ये विषाणूचा लोड कमी आहे. IIT मद्रासमध्ये कोरोनाचा विस्फोट, तब्बल 55 बाधितांची नोंद, खबरदारीचा उपाय म्हणून पाठवले विलगीकरणात कामधेनू विद्यापीठ आणि गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या संशोधकांनी राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशातील घोडे, गायी आणि म्हशींच्या नाक आणि गुदाद्वारातील नमुने घेतले. यापैकी 24 टक्के प्राणी पॉझिटिव्ह आढळले असून, एका कुत्र्याच्या नमुन्यात कोरोनाचा डेल्टा प्रकार असल्याचे आढळून आले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, भारतात पहिल्यांदाच असं संशोधन करण्यात आलं आहे. त्यातील माहितीनुसार, दुभत्या जनावरांनाही या विषाणूची लागण होऊ शकते. या पूर्वीच्या संशोधनात मांजर, बीव्हर या प्राण्यांना कोविड संसर्ग झाल्याचे समोर आले होते. हे संशोधन गुजरात राज्य जैवतंत्रज्ञान मिशनने स्पॉन्सर केले होते. या रिसर्चचा डेटा आता ऑनलाइन उपलब्ध आहे. या रिसर्चसाठी संशोधकांनी 195 कुत्रे, 64 गायी, 42 घोडे, 41 शेळ्या, 39 म्हशी, 19 मेंढ्या, 6 मांजरी, 6 उंट आणि एका माकडासह 413 प्राण्यांचे नाक किंवा गुदद्वारातील नमुने घेतले. अहमदाबाद, आणंद, गांधीनगर, बनासकांठा, पाटण, कच्छ आणि मेहसाणा जिल्ह्यांतून नमुने गोळा करण्यात आले.
शेवटचे नमुने मार्च 2022 मध्ये गोळा करण्यात आले होते. नाकातील नमुन्यांपेक्षा गुदद्वारातील नमुन्यांचे परिणाम चांगले असल्याचं संशोधनात म्हटलंय. त्यापैकी एकूण 95 जनावरं कोविड पॉझिटिव्ह आढळून आली असून त्यात 67 कुत्रे, 15 गायी आणि 13 म्हशींचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राण्यांना संसर्ग झाला होता. त्यामुळे या संशोधनाचा उद्देश प्राणी आणि माणसांमधील विषाणूच्या प्रसाराचा सखोल अभ्यास करणं हा होता. हा विषाणू माणसांच्या जवळ असल्याने या प्राण्यांमध्ये आला आहे. दरम्यान मांजरीच्या प्रजातींबद्दल अधिक माहिती गोळा करणं आवश्यक आहे, असं या रिसर्चमध्ये म्हटलंय.