दैनिक चालु वार्ता
लोणंद प्रतिनिधी
संभाजी गोसावी
लोणंद :- लोणंद पोलिस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून सदर घटनेबाबत स्वता महिलेने पोलीस स्टेशनला फोनवरून दिली माहिती. याबाबत लोणंद पोलीस स्टेशनकडुंन मिळालेल्या माहितीवरुन पांढरी तरडगाव येथील आरोपी सौ. आरती सोमनाथ गायकवाड या महिलेने लोणंद पोलीस स्टेशनला फोनवरुन मी माझ्या लहान बाळाचा खून केला आहे. तरी तुम्ही लगेच गाडी पाठवा नाहीतर मी आणखीन दुसऱ्या कुणाचा तरी खून करीन असे लोणंद पोलीस स्टेशनला आरोपी महिला आरती गायकवाड हिने माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षांत घेताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. विशाल वायकर आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन सदर महिलेस ताब्यांत घेण्यांत लोणंद पोलिसांना यश मिळाले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास लोणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.