
दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
नांदुरा :- दि.२६. घरगुती विजबिल नांदुरा तालुक्यातील उशिरा मिळत आहेत. बिल भरायची शेवटची तारीख असते त्या दिवशी बिल मिळते.तर काही नागरिकांना तर बिल भरायची तारीख निघून गेल्यावर बिल मिळते.त्यामुळे नागरिक बिल भरू शकत नाही व म्हणून व्याज,दंड असा आर्थिक भूदंड नाईलाजाने ग्राहकांना सोसावा लागतो. तर कधी कर्मचाऱ्यां जवळ वीजबिल दिलेले असते परंतु कर्मचार्याच्या हलगर्जीपणामुळे थकित असलेले बिल आणि चालू महिन्यातले आलेले बिल व त्याला अव्वाचे सव्वा व्याज त्यामुळे रक्कम वाढल्यामुळे ग्राहक वीजबिल भरू शकत नाही.
नंतर आपलेच कर्मचारी बिल न भरल्यामुळे वीज ग्राहकाचे कनेक्शन कट करतात. म्हणून आताची कार्यरत एजन्सी त्वरित बदलून सक्षम एजन्सीला काम देण्यात यावे व हल्लीच्या एजन्सीवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा नागरिकांच्या वतीने आंदोलन करावे लागेल. अशा प्रकारचे निवेदन कार्यकारी अभियंता एम एस ई बी कार्यालय मलकापूर यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने यांच्या वतीने देण्यात आले आहे.