
दैनिक चालु वार्ता
अहमदपूर ता.प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
अहमदपूर :- ता .अहमदपूर जि. लातूर येथील राळगा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सृजनशील अध्यापिका श्रीमती कविता गुट्टेवाडीकर मॅडम यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे . राळगा तांडा शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक प्रेरणादायी उपक्रम राबविले आहेत. लोप पावत चाललेले वाचनसंस्कृती अभियान रुजविण्यासाठी त्यांनी मोलाचे प्रयत्न केलेले आहेत . विविध सामाजिक , शैक्षणिक आणि राष्ट्रीय कार्यातील त्यांचा सहभाग आम्हाला मार्गदर्शक असाच आहे. त्यांना मिळालेल्या जिल्हास्तरीय बहुमानाचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघास मनःस्वी अभिमान आहे.
आपणास येत्या काळातही असेच उज्वल यश मिळो हीच प्रार्थना रक्तदान चळवळीत सक्रीय सहभाग अनेक गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या कार्यातील योगदानासाठी सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार शाळेस प्राप्त ,जनगणना, लसीकरण राष्ट्रीय कार्यात सहभाग लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतील बाला उपक्रमात १०० गुणांसह जिल्हयात प्रथम क्रमांकाची शाळा विद्यार्थ्यांना स्व कृतीतून आणि पूर्णपणे उपक्रमातून शिक्षण हे शाळेचे वैशिष्ट्य आहे. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक विषयातील “उपक्रमाचा शतकोत्सव” हा उपक्रम राबविला. विषयवार अध्ययन निष्पत्तीवर आधारीत स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याद्वारे अध्यापन, प्रत्येक विषयाचे टाकाऊ पासून टिकाऊ तयार केलेले ५० प्रकारचे शैक्षणिक साहित्य शिक्षक परिषदेचे सन्माननीय तालुका अध्यक्ष श्री व्यंकुरामजी उगिले सर यांच्या हस्ते त्यांना निवडपत्र देण्यात आले . यावेळी मा.प्रकाशजी भालेराव सर,मा.संजयजी पवार सर उपस्थित होते.
जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे विभागीय सहसचिव मा.प्रभाकरराव कांबळे सर, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.बी.एन.शिंदे साहेब, सांगवी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक मा.मनोहरराव घोगरे सर,डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष मा.धनंजय उजनकर सर, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी सभेचे मराठवाडा कार्याध्यक्ष मा.शंकरराव कदम सर,जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन मा.यशवंत मुंडकर सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मा.महादेव होनराव सर, आदर्श शिक्षक समितीचे तालुका अध्यक्ष मा.डी.के.देवकत्ते सर, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष मा.जीवनराव नवटक्के सर,प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मा.जगदिशराव जाधव सर,कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे तालुका अध्यक्ष मा.सुजितराव गायकवाड सर,महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघ महिला शाखेच्या तालुका अध्यक्ष मा.प्रविणा बोंडगे मॅडम,तालुका सरचिटणीस मा.कल्पना मोटे मॅडम,मा.मुद्रिका तेलंगे मॅडम,महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक महासंघाचे तालुका सरचिटणीस मा.हनुमान शिसोदे सर, मा.ज्ञानोबा बोडके सर, मा.शंकरराव मस्के सर, मा.शेकाजी गायकवाड सर, मा.तानाजी पुठ्ठेवाड सर, मा.साईनाथ डोंगरे सर आदीनी अभिनंदन केले आहे.
दि.२५ एप्रिल २०२२ रोजी दयानंद सभागृह लातूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्विकारताना मा. सौ.कविता पवार (गुट्टेवाडीकर) श्री संजय पवार सर यावेळी लातूर लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.सुधाकर श्रंगारे साहेब, माजी आमदार मा.बब्रुवानजी खंदाडे साहेब, भाजपाच्या प्रदेश पॅनलिस्ट मा.प्रेरणाताई होनराव, शिक्षणाधिकारी (मा) मा.नागेश मापारी साहेब, शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मा.किरण भावठाणकर,शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष( प्रा) मा.पुरूषोत्तम काळे,शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष मा.संजय कोठाळे,लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे स्वीकृत सदस्य मा.गोपाळराव पडीले,शिक्षक परिषदेचे लातूर जिल्हाध्यक्ष मा.मच्छिंद्र गुरमे, शिक्षक नेते मा.संजयजी मरेवाड, शिक्षक परिषदेचे अहमदपूर तालुका अध्यक्ष मा.व्यंकुराम उगिले, केंद्रप्रमुख मा.संभाजी कासले,मा.संजय पवार आदी उपस्थित होते.