
दैनिक चालु वार्ता
संभाजी गोसावी
प्रतिनिधी ता. कोरेगाव
कोरेगाव :- करंजखोप येथे सालाबादप्रमाणे ग्रंथराज श्री. ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण अखंड हरिनाम सप्ताहांचे आयोजन करण्यांत आले असून. वार मंगळवार दि. ३/ ५/ २०२२ते सांगता दिनांक १०/५/२०२२ मे दैनदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ काकड आरती सकाळी ८ ते ११ ते दुपारी ३ ते ५ सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन ५ ते ६ प्रवचन सायंकाळी ६ ते ७ सामुदायिक हरिपाठ रात्री ९ ते ११ कीर्तन व हरी जागरणाचा कार्यक्रम होईल.
कीर्तनसेवा वार मंगळवार दिनांक ३मे वेदाचार्य ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज तळेकर खेड जागर (करंजखोप) वार बुधवार दिनांक ४ मे ह.भ.प योगेश महाराज यादव सोळशी. जागर (नांदवळ) वार गुरुवार दिनांक ५ मे ह.भ.प सुमित्रा महाराज जाधव निनाम पाडळी (भारुड चार्य अशोक महाराज सदाशिवनगर यांचे भारुड होईल) वार शुक्रवार दिनांक ६ मे ह. भ. प सुरज महाराज शिंदे करंजखोप जागर (राऊतवाडी) वार शनिवार दिनांक ७ मे रामायणचार्य श्रीहरी महाराज आळंदकर आळंदी जागर (चंद्रेश्वर भजनी मंडळ चांदक) वार रविवार दिनांक ८ मे ह.भ.प मीराताई दीक्षित भुईज जागर (सोनके) वार सोमवार दिनांक ९ मे ह.भ.प आझाद महाराज गुजर आनेवाडी जागर (रणदुल्लाबाद) व मंगळवार दिनांक १० मे रोजी ह .भ. प महादेव महाराज मोरे महाड यांचे काल्यांचे कीर्तन होईल.
सायंकाळी दुपारी ४ ते ७ या वेळेत करंजखोप गावातून सर्व ग्रामस्थांच्या व माता बहिणींच्या उपस्थिंतीत भव्य दिंडी सोहळा संपन्न होईल यानंतर कार्यक्रमांची सांगता होईल.