
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी जाहीर सभा घेण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे सभेसाठी पोलिसांकडून अजूनही परवानगी मिळालेली नाही. पण अस असलं तरीही राज ठाकरेंची सभा होणारच; यावर मनसे ठाम असून, रविवारी मनसेकडून सभेच्या ठिकाणी व्यासपीठाचे पुजन करून उभारणीच्या कामास सुरवात करण्यात आली आहे. आणी मनसे तर्फे वार्डा वार्डात फिरुन निमत्रक पत्रिका वाटण्यात आल्या. मनसे पद धिकाराकडुन जोरदार तयारी चालु आहे. पण प्रसासनकडुन मात्र हिरवा कंदिल मिळालेला नाही.