
दैनिक चालु वार्ता
आकर्षक बैलबंडी सजावट करित क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशेभूषेत विद्यार्थ्यांनी दिले शिक्षणाचे संदेश
कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी
प्रदिप मडावी
कोरपना तालूका सांगोडा :- नुकताच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,सांगोडा च्या वतीने शाळापूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला. यासाठी शा.व्य.स अध्यक्ष विकास अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली सांगोडा गावाचा सरपंच संजना सचिन बोंडे यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. सर्वप्रथम गावात दिंडी काढण्यात आली. यामध्ये विविधी भजनमंडळींनी भजन गाऊन सर्व गावकऱ्यांचे लक्ष वेधले. शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे दिंडीत स्फुर्ती भरली तर आकर्षक बैलबंडी मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधत होते. दिंडी प्रमुख मार्गानी फिरवून दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या घरी नेण्यात आली. विद्यार्थ्यांना आकर्षक फुगे देऊन बैलबडीत बसवून वाजत गाजत शाळेत आणण्यात आले.
शाळेत सरपंच संजनाताई बोंडे यांच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले. सात स्टॉल लावून नवीन विद्यार्थी तथा त्यांच्या आईला माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना व उपस्थिताना अल्पोपहार देण्यात आला. यासाठी सर्व शा.व्य. स. अध्यक्ष विकास अवताडे, माजी सरपंच सचिन बोन्डे, शाळेचा मुख्याध्यापिका शोभा शेंडे, शिक्षक रमेश पडवेकर, रमेश टेकाम, धांडे सर, व्यवस्थापन समिती सदस्य,अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, तरुणवर्ग, पालकवर्ग,तथा स।समस्त सांगोडा ग्रामवासीयांनी अथक परिश्रम घेतले आणि मेळावा अविस्मरणीय बनविला.