
दैनिक चालु वार्ता
पारनेर प्रतिनिधी
विजय उंडे
देसवडे ता. पारनेर :- येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती उत्साहात पार पडली. यावेळी खाडे वस्ती मध्ये समाज मंदिर बांधकाम करणे – ७ लक्ष व रस्ता कॉंक्रिटीकरण करणे – ४ लक्ष या कामाचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेच्या बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.शिवसेना नेते मा. बाबासाहेब कुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वातंत्र्यानंतरचे पहिले कायदा मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान मिळाला. बाबासाहेबांनी देशाला घटना दिली आज संपूर्ण देशात घटनेला अनुसरून काम केले जाते.
आपली लोकशाही यावरती चालू आहे.समता, बंधुभाव या गोष्टी आपणाला त्यांच्याकडून शिकायला मिळाल्या.समाजातील सर्व मानव एक आहे सर्वांना सारखा न्याय दिला पाहिजे म्हणून न्यायासाठी संघर्ष करायला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव त्यांच्यापासून समाजाने प्रेरणा घेतली पाहिजे. माजी आ. विजय औटी यांच्या माध्यमातून या देसवडे गावांमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे झालेली आहेत.या गावाने माझ्यावर विशेष प्रेम केले मला मागील चुरशीच्या निवडणुकीतील विजयात मोठे योगदान या गावचे आहे.
त्यातून उतराई होण्याचा पाच वर्षात प्रयत्न केला.मी या गावात कोट्यावधीची विकास कामे केली. यामध्ये चेडोबापठार रस्ता, बोरमळी चा रस्ता, गावातून काळेवडी कडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्ता, टेकडवाडी येथील हनुमान मंदिराचा सभामंडप, काळेवाडी येथील शाळा खोली, भोर वस्ती कडे जाणारा रस्ता, चेडोबा पठार ते टेकुडे वस्ती कडे जाणारा रस्ता, अशी अनेक विकास कामे माझ्या माध्यमातून या गावात झालेली आहेत.सध्या राजकारणाचा दर्जा खालावत चालला आहे,त्याचा परिणाम समाजावर होणार नाही याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे. आपल्या गावात वाद होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे.सामाजिक वातावरण बिघडू देऊ नका मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतो.
आपापसात वाद करू नका, विकासकामांवर चर्चा घडवा, वैचारिक मतभेद असू शकतात पण व्यक्ती द्वेष मनात ठेवू नका. राजकारणातून मतभेद होऊ देऊ नका. सर्व माणसे आपली आहेत तरुणांनो माथे भडकवणारी समाजात खूप आहेत समाजाचे स्वास्थ्य बिघडू नका आणि अशा प्रकारचे काम कोणी करत असेल तर त्यापासून बाजूला राहा, अशा लोकांना चार विकास कामे करायला सांगा. एखादे नेतृत्वाला आणल्या गावचा विकास करायला सांगा पण गावात वाद लावू नको असे सांगण्याचे धाडस तरुणांनी घेण्याची वेळ आली आहे.मी पाच वर्षात तालुक्यात विकास कामे केली यापुढेही मागे राहणार नाही याची ग्वाही देतो. चांगले काम करणा-यांच्या मागे उभे रहा असे या जयंतीनिमित्त आपणास सांगतो आपण सर्वांनी आम्हाला बोलावले आमचा मान सन्मान केला केला सर्वांना धन्यवाद देतो.
यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख शुभम टेकुडे, संघटक दिपक उंडे, मा चेअरमन भाऊसाहेब टेकूडे, सरपंच पोपट दरेकर, चेअरमन संतोष टेकूडे, वारणवाडी सरपंच संतोष मोरे, निजाम पटेल, माजी सैनिक गुंड साहेब, श्रीरंग पाटील गागरे, विनायक पाटील गागरे,शिवसेना उपतालुका सो मीडिया दत्ता वाडेकर, दत्ता फटांगरे,उत्तम भोर पाटील, साहेबराव वाडेकर, सुयोग टेकूडे शाखा प्रमुख, बाबासाहेब वाडेकर शाखा प्रमुख, विक्रम टेकूडे, शंकर टेकूडे, ज्ञानदेव पवार, जाणकू दूधवडे, सचिन भोर उपसरपंच,तेजस भोर, अमोल भोर, सतीश वाडेकर ,कारभारी टेकूडे, संचालक पांडुरंग दरेकर, नितीन फटांगरे, नवनाथ जाधव, सुभाष फटांगरे, सोनबा खाडे, भाऊसाहेब खाडे, भास्कर खाडे, ठेकेदार वाळुंज, सुनिल खाडे, देविदास टेकूडे, किशोर खाडे, संतोष भोर, संतोष गोळे,सचिन घेमबुड, साहिल पारधी, मयूर टेकूडे, किशोर टेकूडे, विठ्ठल फटांगरे, राहुल पारधी, ठमा शेठ भोर इतर मान्यवर उपस्थित होते.