
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करण्यासाठी रेल्वे विभागाने अतिरिक्त डब्यांची केली सोय
वर्ष 2021-22 मध्ये रेल्वेच्या माध्यमातून 111 दशलक्ष टन कोळसा पुरवठ्याचा विक्रम
नवी दिल्ली :- देशभरातील ऊर्जानिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी रेल्वेच्या जाळ्याच्या माध्यमातून अधिक प्रमाणात कोळशाची वाहतूक करता यावी या उद्देशाने भारतीय रेल्वे विभागाने अतिरिक्त गाड्या तसेच अतिरिक्त डब्यांची सोय केली आहे. भारतीय रेल्वेने कोळसा वाहतुकीला वेग दिल्यामुळे सप्टेंबर 21 ते मार्च 22 या काळात 32% अधिक कोळशाची वाहतूक झाली आहे तर एप्रिल 2022नंतर संसाधनांच्या कार्यक्षम वापरामुळे या वाहतुकीत 10% वाढ नोंदली गेली आहे.
वर्ष 2021-22 दरम्यान भारतीय रेल्वेने रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून कोळसा वाहतूक वाढवून तब्बल 111 दशलक्ष टन एवढ्या विक्रमी प्रमाणात कोळशाची वाहतूक झाली असून गेल्या वर्षी झालेल्या 542 दशलक्ष टन कोळशाच्या लोडिंगच्या तुलनेत या वर्षी लोडिंगमध्ये 20.4% ची वाढ नोंदवत 653 दशलक्ष टन इतक्या विक्रमी कोळशाचे लोडिंग झाले आहे. तसेच सप्टेंबर 21 ते मार्च 22 या कालावधीत उर्जा क्षेत्रासाठी होणाऱ्या कोळशाच्या लोडिंगमध्ये केवळ दोन तिमाहींमध्ये 32% वाढ झाली आहे.
एप्रिल 2022 मध्ये भारतीय रेल्वे विभागाने उर्जा क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या कोळशाच्या लोडिंगला प्राधान्य देण्यासाठी अनेक पावले उचलल्यामुळे एका आठवड्याच्या कालावधीत कोळसा पुरवठ्यात 10% वाढ झाली आहे. रेल्वे विभागाच्या ज्या उपाययोजनांमुळे ही सुधारणा शक्य झाली त्यापैकी काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत. कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्यांना रेल्वे मार्गावर प्राधान्य दिले जात असून रेल्वे गाड्यांमध्ये कोळसा भरण्यापासून त्यांचा प्रवास आणि शेवटी प्रकल्पाच्या ठिकाणी तो उतरविला जाईपर्यंतच्या संपूर्ण चक्रादरम्यान प्रत्येक गाडीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
प्राधान्य दिल्यामुळे आणि बारकाईने लक्ष ठेवल्यामुळे लांब अंतरावर असणाऱ्या महत्त्वाच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांपर्यंत पोहोचण्याचा वेळ 12 ते 36 % नी लक्षणीय प्रमाणात कमी झाला.
भारतीय रेल्वे विभागाने लांबच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या गाड्यांच्या वाहतुकीला प्राधान्य दिले आहे आणि 1 ते 10 एप्रिल या कालावधीत आघाडीवर असणाऱ्या कोळसा गाड्यांपेक्षा गेल्या 5 दिवसांतील या गाड्यांची आघाडी 7%नी वाढली आहे यावरून ते दिसून येते.
कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्यांच्या सरासरी आघाडीत वाढ झाली असली तरी एकाच गाडीच्या लागोपाठच्या दोन लोडिंगदरम्यानचा वेळ 10%नी कमी झाला आहे. या परिचालनात्मक अभिनव उपक्रमांसोबतच भारतीय रेल्वेने, ऊर्जानिर्मिती प्रकल्पांपर्यंत कोळसा वाहून नेणाऱ्या गाड्या वाढविण्यासोबतच अखंडितपणे अधिक कोळशाच्या डब्यांचे लोडिंग देखील केले आहे.