
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- लोहा तालुक्यातील मौजे बोरगाव आ. येथील नागरिकांचा संजय गांधी निराधार/ श्रावण बाळ योजनेचे गेल्या १५ महिन्यांपासून बंद केलेले अनुदान सुरू करण्याच्या मागणीसाठी लोहा तहसील कार्यालयावर तर सहा महिन्यांपासून घरकुलाचे रखडलेले बीले आदा करा या मागणीसाठी लोहा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा धडकला. बोरगाव आ.येथील गावातील राजकारणामुळे खोट्या तक्रारी लोहा तहसील कार्यालयात केल्यामुळे अनेक गोरगरीब, वृध्द नागरिक विधवा महिला या योजनेत पात्र असुन सुद्धा त्यांचे चालू असलले अनुदान गावातील काही उपद्रवी लोकांनी राजकारण करून खोटी तक्रार दाखल केल्यामुळे त्यांचे अनुदान लोहा तहसील कार्यालयाच्या निराधार विभागाने बंद केले असल्यामुळे या निराधार लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे .
तेव्हा या प्रकरणाची लोहा तहसिलदारांनी तात्काळ चौकशी करून पात्र लाभार्थ्यांना गेल्या १५ महिन्यांपासून बंद असलेले अनुदान तात्काळ वाटप करावे या मागणीसाठी त्यांनी आज दि. २६ एप्रिल रोजी लोहा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी लोहा तहसिल कार्यालयात तहसिलदार, नायब तहसीलदार कुणीही निराधार मोर्चाकरी यांचे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नव्हते. मोर्चेकरांनी दोन तास वाट पाहून शेवटी महिला पेशकार यांच्याकडे तहसीलदार यांच्या नावाने निवेदन दिले. निराधार विभागाच्या महिला कारकुन यांच्या बद्दल निवेदनात तक्रार केली. तसेच यावेळी बोलताना अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या.
तसेच बोरगाव आ.येथील अनेक नागरिकांनी घरकुल योजने अंतर्गत घरकुले बांधून पूर्ण केली आहे पण गेल्या सहा महिन्यांपासून घरकुलाचे बिले लाभार्थ्यांना मिळाले नसल्यामुळे लोहा पं.स. कार्यालयावर नागरिकांना मोर्चा काढून बीडीओ शैलेश यांच्या समोर लाभार्थ्यांनी बिले मिळाले नसल्यामुळे कैफियत मांडली. तेव्हा यांची लोहा पंचायत समितीचे बीडीओ शैलेश व्हावळे यांनी तात्काळ घेतली व घरकुल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन धारेवर धयले व घरकुल लाभार्थ्यांचे बीले तात्काळ करण्याचे आदेश दिले. व दोन दिवसांत घरकुले लाभार्थ्यांना बीले मिळून जातील असे सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांचे समाधान झाले.
यावेळी या मोर्चात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी या मोर्चाचे नेतृत्व युवा नेते अजित पाटील बोरगावकर यांनी केले. यावेळी चूनुमिया शेख, भीमराव पाटील, सुरेश पाटील, बालाजी पाटील, हुसेन शेख, राजू पाटील,केशव सुरनर,नारायण हंकारे, दूलबा हंकारे, बापूराव भालेराव ,पांडुरंग गळेकाटू , सत्तार शेख, गुलाब शेख,सोपान गायकवाड , गोविंद गळेकाटू,खुशाल पेंडुकर, केशव येडके, मारुती पाटील, विठ्ठल पाटील ,ओमकार चापके ,व गावातील निराधार, विधवा, अपंग महिला व पुरुष यांची लक्षणीय उपस्थिती होती.