
दैनिक चालु वार्ता
कंधार लीहा विशेष प्रतिनिधी
ओंकार लव्हेकर
नांदेड :- आज दि.१८/०४/२०२२रोज सोमवारी जि.प.प्रा.शा. पानशेवडी ता.कंधार येथील शाळेत मुख्याध्यापिका सौ.निलिमा यंबल यांच्या मार्गदर्शनाखाली समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रतिनिधी केशव बसवंते, उपाध्यक्ष अंबादास चव्हाण,सदस्य समाधान भालेराव व साहेबअली शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी कोंडीबा मोरे,शिक्षणतज्ञ प्रतिनिधी सचिन गायकवाड, व शाळेतील शिक्षक देवराव ताटे, कैलास गरूडकर,प्रजाल शिंदे , दत्ता मुंडे, रत्नाकर केंद्रे, दिगंबर मरशिवणे,सौ अंजली उमाटे,सौ मनिषा हिमटे,राम सोनकांबळे, गोविंद पवार आदि कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निलीमा यंबल यांनी तर आभार दत्ता मुंडे यांनी केले.