
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
मुंबई :- 1987 च्या तुकडीच्या आय.आर.एस (भारतीय महसूल सेवा) अधिकारी गीता रविचंद्रन यांनी प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. महसूल संकलनाच्या बाबतीत मुंबई हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठी मुंबईमध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 4,42,774 कोटी रुपये होते, जे भारताच्या एकूण कर संकलनाच्या 32% आहे. प्रधान मुख्य आयकर आयुक्त, मुंबई म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, गीता रविचंद्रन यांच्याकडे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विभागांच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदाचा कार्यभार होता.
त्यांनी चेन्नई, मुंबई, नागपूर आणि बंगळुरूसह देशाच्या विविध भागात सेवा बजावली आहे. त्यांच्या 34 वर्षांच्या उत्कृष्ट कारकिर्दीत त्यांनी मूल्यांकन, शोध मूल्यांकन, न्यायाधिकरण प्रतिनिधी, टी डी एस, अन्वेषण विभाग, आणि आंतरराष्ट्रीय कर आकारणी अशा अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या चेन्नईयेथील स्टेला मॅरिस कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यांना लेखन आणि वाचनासोबतच संगीताचीही आवड आहे.