
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद प्रतिनिधी
मोहन आखाडे
औरंगाबाद :- औरंगाबाद वैविध्यपूर्ण आंदोलनांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चर्चेत ठेवलेले, पण अचानक जिल्हाध्यक्ष पदावरून दूर सारण्यात आल्याने दुखावलेले मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी अखेर पक्षाला जय महाराष्ट्र करीत भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. मंगळवारी (दि. २६) मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दाशरथे यांचा भाजप प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपचे औरंगाबादेतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेला अवघे चार दिवस बाकी असतानाच दाशरथे पक्ष सोडून भाजपमध्ये गेल्याने मनसेला हा धक्का मानला जात आहे. शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख व सहसंपर्क प्रमुख असे ३८ वर्ष शिवसेनेत काम केल्यावर दाशरथे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत मनसेत प्रवेश केला होता. आक्रमक भूमिकेसह त्यांनी शहरात मनसेतर्फे अनेक लक्षवेधी आंदोलने करत अनेकांचे लक्ष वेधले होते. आधी शिवसेनेत असल्याने औरंगाबादमध्ये संघटनात्मक बांधणीचे कौशल्य असल्याने मनसेची संघटना बांधणी त्यांनी केली होती.
मात्र, चार महिन्यांपूर्वी महिन्यांपूर्वी मनसेतील अंतर्गत राजकारणाचा त्यांना फटका बसला आणि राज ठाकरेंच्या दौऱ्यात अचानक त्यांना पदावरून बाजूला करण्यात आले. यानंतर ते मनसे सोडतील, अशा चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्यावेळी दाशरथे यांनी पक्ष सोडणार नसलेचे बोल ले जात होतो पण त्यांनी आचाणक निर्णय घेतला. त्याच्यासोबत त्यांचे समर्थक असलेल्या मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र अशा पोस्ट सोशल मीडियावर करत पक्ष सोडला आहे. यामध्ये दीपक पवार, संतोष कुटे, बाबुराव जाधव, किरण गवई, सतीश देवगिरीकर, संदीप कुलकर्णी, राहुल कुलकर्णी, अमित पायमोडे, योगेश पवार, रमेश पुरी, राहुल कुबेर, राजू चव्हाण, कृष्णा घयात पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे..
भाजप मनसे युतीच्या चर्चा असतानाच घडामोडी राज ठाकरेंनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राज्यात भाजप आणि मनसे युती होणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्या आधीच भाजपकडून मनसेला भगदाड पडल्याचे बोलले जात आहे. आगामी काळात औरंगाबाद मनपा निवडणूक आहे. यावेळी दाशरथे यांच्यामुळे भाजप-शिवसेनेत शह काटशहाचे राजकारण रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. औरंगाबाद मनपा निवडणुकांचा पाठीशी असलेला अनुभव आणि पक्षबांधणीच्या जोरावर दाशरथे यांच्या भाजपमध्ये जाण्याने मनसेसह शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, दशरथे यांच्या भाजप प्रवेशावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड, आमदार अतुल सावे, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, संघटनमंत्री संजय कोटगे, शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर, माजी महापौर बापू घडामोडे, जिल्हा चिटणीस राजू शिंदे, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.