
दैनिक चालु वार्ता
भिगवन प्रतिनिधि
जुबेर शेख
भिगवन :- भिगवन रेल्वे स्टेशन मधील रेल्वे गेट मुळे नागरीकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी चा सामना करावा लागत आहे.सदरील रेल्वे गेट सतत रेल्वे गाड्यामुळे बंद राहिल्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी कामगार वर्ग, शेतकरी, व्यापारी व मजूर हे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. व यातून रेल्वे प्रशासन तसेच केंद्र सरकारने मार्ग काढ़ावा अशी मागणी लोकांमधून येत आहे. भिगवन ही खूप मोठी बाजार पेठ असून भिगवन मधे जाण्यासाठी भिगवन स्टेशन कर व्यक्तिरीक्त राजेगांव, वाटलूज, नायगांव, मलठन याच बरोबर खूप मोठ्या प्रमाणात वाड्या व वस्ती मधील लोकांना भिगवन रेल्वे स्टेशन वरुण जावे लागते, परंतु सतत ची रेल्वे वाहतूक व मालधक्का असल्याने रेल्वे गेट सतत बंद राहते.
यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या रेल्वे गेट सतत बंद चालु असल्यामुळे एखादा आजारी रुग्ण दगावन्याची भीति देखील ग्रामस्थ व्यक्त करत आहे. भिगवन ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, रेल्वे गेट अंडर पास् ची व्यवस्था यासाठी ग्रामपंचायत च्या माध्य मातून आम्ही सतत रेल्वे अधिकारी यांच्याशी संपर्क मधे असून लोकांची गैरसोय टाळण्या साठी अंडर पास् किंवा जुणी वाहतूक मोरी चालु करण्यासाठी प्रयत्नशील आहोत,असे नमूद केले.