
दैनिक चालु वार्ता
मंठा ( प्रतिनिधि)
दि. २५-०४-२०२२
मंठा :- सदरील घटना अतिशय क्रुरपणे केलेली आहे यामध्ये आरोपी ने मनोज यास मारीत असतांना मोठ मोठाले लाकडी व लोखंडी राॅड व्हिडिओ क्लिप मध्ये दिसत आहेत सदरील आरोपी हे गुंड प्रवृत्तिचे आसूं त्यांनी मनोज यास चोरीचा आरोप घेऊन नियोजन पध्दतीने जीवे मारुन टाकले आहे. मयत मनोज हा अतिशय गरीब कुटुंबातील असून त्यास दोन लहान चिमुकले आहेत मनोज च्या जाण्यामुळे लहान मुलांचे छत्र हरवले आहे तरी मयताच्या कुटुंबास शासनाकडुन आर्थिक मदत देण्यात यावी व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी आसे असायचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतांना भिमराव साहेबराव वाघ(जय भिम सेना जालना जिल्हा उपाध्यक्ष ) पिराजी पवळे (मातंग समाजाचे नेते व जय भिम सेना शहर अध्यक्ष मंठा) राज खनपटे मातंग समाजाचे नेते व जय भिम सेना युवक शहर अध्यक्ष मंठा) सुरेश मगर (ता . महासचिव मंठा) अजय गायकवाड (समाजिक कार्यकर्ते) सचिन कांबळे, नंदकिशोर खनपटे,सतिष खनपटे,नाना खनपटे,संजय खनपटे, जनार्दन खनपटे, अमोल मोरे, चंद्रकांत खनपटे,व बहुसंख्य जय भिम सेना व मातंग समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.