
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यामध्ये ( वाळू तस्करांवर दोन आयएएस (IAS) अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे आठ हायवा ट्रक जप्त करुन तहसिल कार्यालय परिसरात लावण्यात आले आहेत. आज दुपारी हि कारवाई करण्यात आली. आयएएस असलेले आणि नव्यानेच देगलूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी पदी रुजू झालेल्या सौम्या शर्मा आणि मुखेड येथील सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी देगलूर येथून अवैध वाहतूक करणारे आठ हायवा ट्रक जप्त केलेत.
या धडक कारवाई मुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले असून वाळू माफियांना अभय देणाऱ्यांवरही आता कारवाई होणार आहे. जप्त केलेल्या आठ ट्रक कडून 35 लाखांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. अशी माहिती महसुलच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. देगलूर, बिलोली तालुक्यातील वाळू केंद्रावरुन मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करुन दिवसरात्र वाहतूक केली जाते. या वाहतूक करणाऱ्या ट्रककडे जुन्या वाळूच्या रॉयल्टीच्या पावत्या आहेत. त्यामुळे ही कारवाई केली गेली.