
दैनिक चालु वार्ता
वडेपुरी प्रतिनिधि
मारोती कदम
नांदेड :- अंबेसांगवी या गावामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राहुल हंबर्डे व नरेंद्र गायकवाड यांच्या हस्ते पंचरंगी व निळ्या झेंड्याचे झेंडावंदन झाले.तसेच नरेंद्र गायकवाड पंचायत समिती उपसभापती, श्रीनिवास मोरे सर पंचायत स.सदस्य, कवी प्रा.उध्दव कांबळे ढाकणीकर सर ,यानी गौतम बुद्ध व बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पूजन झाल्यानंतर पाहुणे मंडळीचा सत्कार भीमजयंती मंडळाकडुन करण्यात आला.
यावेळी भीमजयंती मंडळ अध्यक्ष भानुदास वाघमारे यानी सर्व मंडळीचे स्वागत केले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीनिवास मोरे सर होते,प्रमुख पाहुणे नरेंद्र गायकवाड, आमदार मोहन आणा हंबर्डे यांचे सुपुत्र राहुल हंबर्डे, व कवी प्रा.उध्दव ढाकणीकर , सरपंच धोंडूबाई माधव डुबे,उपसरपंच विक्रम पाटील कदम सर उपस्थित होते. या कार्यक्रमात चेअरमन सुदाम उमरेकर, उपचेअरमन गोविंद कवठेकर, गणपतराव कदम,गोविंदराव सावंत, शिवसंभा पाटील कदममी मराठी एकिकरण समिती मराठवाडा संपर्क प्रमुख, जि ल्हाध्य,राम पाटील सावंत,माधव सावंत भाजपाउपाध्यक्ष, गंगाधर पाटील कदम, नामदेव पाटील कदम, ज्ञानेश्वर शिवाजी पाटील उमरेकर, पांडुरंग पाटील जाधव, संतोष सावंत,संतोष कदम, बाळु पाटील कदम, रावसाहेब उमरेकर, सुभाष सावंत,बाजीराव सावंत, स्वप्नील गव्हाणे पत्रकार, दयानंद डुबे, सुरेश डुबे,नामदेव डुबे,अंकुश कदम, राम पाटील उमरेकर,परमेश्वर उमरेकर नितीन कदमउपस्थित होते.
उध्दव ढाकणीकर सर यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले कि बाबासाहेब यांचे विचार अंगीकृत करावेत.स्वातंत्र्य, समता,बंधुता,या विचाराने वागावे,लोकशाही,मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग, शिक्षण पद्धती,निर्व्यसनी बनावे असे आवाहन केले. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले,अंबेसांगवी येथील गावातील सर्व धर्म समभाव पाहुन ढाकणीकर सर भारावून गेले. नरेंद्र गायकवाड यानी भीमजयंतीच्या निमित्त शुभेच्छा दिल्या.,राहुल भैया यानी मनोगत व्यक्त केले ,श्रीनिवास मोरे सर यानी अध्यक्षीय भाषणात शिक्षण व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मांडून शिक्षणाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश वाघमारे यांनी केले ,तर आभार प्रदर्शन साहेबराव सुर्यवंशी यांनी केले .भीमजयंतीच्या कार्यक्रमाला बुध्द उपासक व उपासिका उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक दिवसे,रत्नाकर दिवसे,व्यंकटि दिवसे,पिराजी वाघमारे अशोक वाघमारे, शिवाजी वाघमारे वसंत वाघमारे,प्रकाश सूर्यवंशी, उतम सुर्यवंशी,शंकर माधव सोनवणे, मोहन वाघमारे, आदी सर्व भीम जयंती चे अध्यक्ष भानुदास वाघमारे ,उपाध्यक्ष व सदस्य मंडळी यांनी परिश्रम घेतले .एकंदरीत या कार्यक्रमातून आंबेसंगवी येथील सर्व धर्म समभाव दिसून आला.