
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यात असलेल्या गायरान जमिनीवर अनेक ठिकाणी मोठया प्रमाणावर परवानगी न घेता अनेकांनी सदरील गायरान जमिनीवर अतिक्रमण करुन जमिन हस्तगत केली असून त्याची संपूर्ण चौकशी करून ती जमीन ताब्यात घेण्यात यावी व सदरील जमिनीवर भवितयात अतिक्रमण न होण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी.
तरी आज पर्यंत आपल्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही त्याची कुठलाच विचार केला नाही. संबधीत अधिकारी अर्ज कचरा कुंडीत फेकला जातो तरी आपण वरील बाबी लक्षात घेऊन भविष्यात अतिक्रमण न होण्यासाठी उपाय योजना करण्यात यावी असे निवेदन जाधव व्यंकटी,माधव वडजे यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना दिले आहे.