दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
ईस्लापुर :- किनवट तालुक्यातील ईस्लापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर डेडवाल यांनी दि. २३/०४/२०२२ रोजी २,०००००/- रुपयांची लाच मागीतली तडजोडी अंती ५०,०००/- रुपये लाच मागणी केली. कारण तक्रारदार यांचा भाऊ गुटख्याच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पंचासमक्ष २,००००० रुपयांची मागणी करुन तडजोडी अंती ५०,००० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.
या केससाठी मार्गदर्शन मा. श्री. डॉ. राहुल खाडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेड, श्री. धरमसिंग चव्हाण, अप्पर पोलीस अधीक्षक. ला. प्र. वि.परिक्षेत्र नांदेड. कार्यवाही पथक श्री. एस. एल. नितनवरे, पोलीस निरीक्षक, एन. सी. हनुमंत बोरकर, एन. पी. सी. एकनाथ गंगातिर्थ, जग्गा अनंतवार, सचिन गायकवाड, पी. सी. अंकुश गाडेकर, प्रकाश श्रीरामे, चापोना मारुती सोनटक्के व सर्व ला. प्र. वि. नांदेड यांनी सापळ्यात अडकवले.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आपल्याला जर कोणते शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने आपले कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड दुरध्वनी क्रमांक ०२४६२-२५३५१२ तसेच पोलीस उपअधीक्षक श्री. राजेंद्र पाटील, मो. न. ७३५०१९७१९७ @टोल फ्री क्रमांक. १०६४