
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी
बापु बोराटे
इंदापूर :- औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनेष आव्हाड या युवकाची किरकोळ कारणावरून २० एप्रिल २०२२ रोजी हत्या करण्यात आली.सदरची घटना ही निंदनिय व माणुसकीला काळीमा फासणारी असुन सदर घटनेचा जाहिर निषेध करून या घटनेतील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन मातंग एकता आंदोलण या सामाजिक संघटनेच्या वतीने इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आरडे यांनी इंदापूर तहसिलदार व पोलीस निरिक्षक यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मनेष आव्हाड याचे दोन्ही हात पाय बांधुनकाठी व लोखंडी गजाने मारहाण करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली.तर गेल्या महिण्यात पूण्यामध्ये मातंग समाजातील युवकाची अशाच प्रकारे निर्घण हत्या करण्यात आल्याने रज्यभरातील मातंग समाज भयभित होउन दहशतीखाली वावरत आहे.
सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून मातंग समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल व या आंदोलनाची सुरुवात इंदापूर तालुक्यामधून होईल असे इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष आरडे यांनी सांगितले. याप्रसंगी गोरगरीब जनतेचे कैवारी व मातंग एकता आंदोलन तालुकाध्यक्ष संतोषभाऊ आरडे,ललेंद्र शिंदे, स्वाती आरडे, अनिता गायकवाड, लक्ष्मी मोहिते,विकास मोहिते, राहूल आरडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.