
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
कोल्हापूर :- पन्हाळा ग्रामीण रुग्णालय पन्हाळा , दवाखाना असून नसल्यासारखा प्रकार आहे आरोग्यदायी उपकरणे सर्वच बंद स्थितीमध्ये आहेत ,असे कळते, ए- सी- जी मशीन बंद एक्स-रे बंद ,रक्त लघवी चेक अप नवीन आधुनिक मशीन आहे ते सुद्धा बंद आहे असं नागरिकांना वारंवार सांगितले जात आहे येते गेल्या दोन वर्षात छोटे-मोठे ऑपरेशन सुद्धा याठिकाणी झाली नाही आहे. एक ही गरोदर बाळंतपण इथे झालेले नाही आहे .तसेच रुग्णावर कसल्याही प्रकारची इथे उपचार केले जात नाहीत डायरेक्ट कोल्हापूर सी, पी ,आर,ची चिठ्ठी लिहून दिली जाते व तिथे उपचाराला जावे असे सांगितले जाते.
काही अपघात घडल्यास थोड्या प्रमाणात सुद्धा लागल्यास डायरेक्ट 108 ला कॉल केले जाते.अँब्युलन्स बोलून पुढील उपचारासाठी पाठवले जाते.या रुग्णालय इथे झालेले covid लसीकरण हे लोकांनी वारंवार आंदोलन करून मगच स्थानिकांना लसी दिल्या गेल्या. नाहीतर कोल्हापूरच्या व आपल्या पाहुण्यांना वशिलेबाजी करून लस्सी दिलेल्या आहेत. तसेच दवाखान्याचे स्वच्छता ऑडिट होत नाही.दवाखान्यात औषधे सुद्धा उपलब्ध होत नाही, खोकल्याचे औषध व इतर औषध मागितले तर स्टॉक संपला असे उत्तर मिळते जो उपलब्ध स्टॉक आहे त्यांची एक्सपिरेशन आणि उपलब्धता यांचा केवळ रिकामा तक्ता लावण्यात आला आहे.
पण प्रत्यक्षात काहीही माहिती दिली जात नाही. मग या दवाखान्याचे उपयोग काय? ग्रामीण रुग्णालय हे या ठिकाणी कामगार वर्ग या रुग्णालयाला फार्महाऊस करून ठेवले आहे. दोन-तीन दिवसांनी दवाखान्यात रस्सा मंडळ च्या पार्ट्या नियोजन कर्मचारी लोक करत असतात बरेच कर्मचारी वर्ग ऑन ड्युटी दारू पिऊन असतात व नागरिकांना अरे तुरे जी भाषा वापरली जाते नागरिकांना समाधान कारक उत्तर व डॉक्टरांकडून औषध नागरिकांना दिले जात नाही आहे.
तिथे कोणत्याही रुग्णाची दखल घेतली जात नाही, हा दवाखाना फक्त तालुका स्तर मधले काही गुन्हे घडल्यास शवविच्छेदन करण्यासाठीच आहे का? काय फक्त लहान मुलांना पोलिओ डोस देण्यासाठी आहे. असा सवाल नागरिकातून होत आहे. यावर योग्य निर्णय मा.जिल्हाधिकारी यांनी घ्यावा ही नम्र विनंती नाहीतर उग्र स्वरूपात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे निवेदनावर रजाऊल्ला मुल्ला , धनवेंद्र जयसिंगराव मेडशिग, राहुल भोसले, समशेर फरास मुबारक मुतवल्ली, पृथ्वीराज नाईकवाडी आमीत उरुणकर आमिर गोलंदाज यांच्या सह्या आहेत,