
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड :- महाराष्ट्रात गुणवत्तेच्या दृष्टीने अव्वल स्थानी असलेली नांदेड जिल्ह्यातील श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार ही संस्था असून या संस्थेअंतर्गत नांदेड शहरात नावलौकिकास व नावारूपास आलेले श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड शाखा असून या शाखेतून इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेतून अनेक विद्यार्थी गुणवत्तेत अव्वल आले असून बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेडीकल व इंजिनिअरिंग प्रवेशास पात्र झाले आहेत.
त्याच अनुषंगाने श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर / नवीन कौठा नांदेड च्या इयत्ता अकरावी कला , वाणिज्य व विज्ञान शाखेचा 2021 – 22 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक निकाल 25 एप्रिल 2022 रोजी घोषित झाला असून विज्ञान शाखेतून गुणानुक्रमे मनिकनगर शाखेतून कु. कल्याणकर शिल्पा संग्राम – 79.17 % ( प्रथम ), तर कु.शिंदे वैष्णवी विश्वनाथ – 78.67 % ( द्वितीय ) आणि कु. बालके वैष्णवी शिवाजी 78.50 % ( तृतीय ) क्रमांकावर उत्तीर्ण झाली असून कौठा शाखेतुन गुणानुक्रमे कु.काकडे अर्पिता चांदु – 80.50 % ( प्रथम ) तर कु.काळे अंकीता नागोराव – 79.84 % ( द्वितीय ) आणि कु.कुरुडे दीक्षा दत्तात्रेय – 78.34 % ( तृतीय ) गुण घेऊन उतीर्ण झाले आहेत.
तसेच माणिक नगर कला व वाणिज्य शाखेतून अनुक्रमे कु.विजापुरे पल्लवी – 77.34 % ( प्रथम ) , कु बोकारे सुजाता – 75.67 % ( द्वितीय ) आणि कु.पतंगे अंकीता 73.34 % ( तृतीय ) गुण घेऊन उत्तीर्ण झाले असून कौठा शाखेतून धुतराज तुषार – 76.50 %( (प्रथम ) तर कु.भुतके दिक्षा – 73.84 % ( द्वितीय ) आणि पाटील पृथ्वीराज – 72.17 % ( तृतीय ) गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत एवढेच नव्हे तर वाणिज्य शाखेतून कु.श्रद्धा श्रीनिवास – 84.34 % ( प्रथम ) तर कु. वैष्णवी पांचाळ – 83.00 % ( द्वितीय ) आणि कु. गायत्री कदम – 82.00 % ( तृतीय ) गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत या गुणवंत विद्यार्थ्यांसोबत उत्तीर्ण झालेल्या कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांचे कॉलेज प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
कोव्हिड – 19 च्या काळात ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापन वर्ग पूर्ण झाल्यानंतर इयत्ता अकरावी वार्षिक परीक्षेचे नियोजन व आयोजन परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मुरलीधर घोरबांड तसेच सहाय्यक प्रा. अमर दहिवडे , प्रा.सौ. रूपाली कळसकर , प्रा.सौ.वैशाली दुलेवाड , प्रा.सौ.रत्नमाला नवघरे , प्रा.शेख रेश्मा तसेच प्रश्नपत्रिका पेपर सेटर्स प्रा. निलेश मोरेश्वर यांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने केल्यामुळे सर्व प्राध्यापक सहका-यांच्या मदतीने इयत्ता अकरावी कला , वाणिज्य , विज्ञान शाखेच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून दिल्यामुळे निकाल वेळेत घोषित करणे शक्य होऊन विद्यार्थ्यांना वाटप केल्याबद्दल शालेय समिती सदस्य मा.वैजनाथराव कुरुडे व मा.सूर्यकांत कावळे तसेच एम.पी. कुरुडे , शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे , उपप्राचार्य परशुराम येसलवाड , पर्यवेक्षक प्रा.माधव ब्याळे , कौठा इन्चार्ज प्रा.सय्यद जमील , श्री सदानंद नळगे , श्री शिवराज पवळे , सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा स्वाती कान्हेगावकर , ज्येष्ठ प्रा.वसंत राठोड इत्यादी मान्यवरांनी परीक्षा विभागाचे व इयत्ता अकरावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसाठी सहकार्य केलेल्या सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन करून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.