
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- भारतीय आयुर्विज्ञान परिषद – स्वास्थ्य अनुसंधान (कउटफ उऌफ) बहुकेंद्रिय टास्क फोर्स अभ्यास प्रकल्प द्वारे भारतातील सर्पदंशामुळे होणाऱ्या घटना, मृत्यू, दुष्परिणाम आणि आर्थिक भार याचा अंदाज बांधण्यासाठी राष्ट्रव्यापी सर्वेक्षण व संशोधन चिकित्सेच्या अभ्यासासाठी देशभरातील १३ जिल्ह्याची निवड करण्यात आली असून त्यात राज्यातील केवळ ३ जिल्हे आहेत. त्यात नांदेड, पुणे व रायगडचा समावेश आहे.जिल्ह्यात मुखेड येथे पुंडे हॉस्पिटलमध्ये येथे डाटा जमा करण्यात येणार आहे हा सर्व्हे अभ्यास राष्ट्रीय आणि अंतर राष्ट्रीय स्तररावरील सर्पदंश विषयक संशोधनासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
त्यानंतर सर्पदंश विषयीचे धोरण ठरवले जाणार आहे. अनुसंधान भारत हा कृषिप्रधान देश आह. त्यामुळे सर्पदंशाचे प्रमाण मोठे आहे. सर्पदंश हा कालापघात असून सर्वसामान्य नागरिक, कष्टकरी यांना सर्पदंश अधिक प्रमाणात होतो. सर्प दंश झालेल्या रुग्णावर उपचार करणे गुंतागुंत व जिकिरीचे असते. मुखेड सारख्या मागास भागात अपुऱ्या साधन सुविधा असतानाही डॉ. दिलीप पुंडे यांनी सर्पदंश रुग्णसेवा ३४ वर्षांपासून सुरु ठेवली आहे. आजपर्यंत त्यांनी १० हजारहून अधिक सर्पदंश रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. सर्पदंश जनजागृतीसाठी ते प्रयत्नशील आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद स्वास्थ्य अनुसंधान (कठटफ-उलफ) बहुकेंद्रिय टास्क फोर्स अभ्यास प्रकल्पातर्फे भारतातील सर्पदंशामुळे होणाऱ्या घटना, मृत्यू, दुष्परिणाम आणि आर्थिक भार याचा अंदाज बांधण्यासाठी राष्ट्रव्यापी अभ्यास मुख्य अन्वेषक डॉ. जयदीप सी. मेनन यांच्या नेतृत्वाखाली ०५ तज्ञांची चमू सर्पदंशविषयक माहिती संकलित करणार आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागात सर्वेक्षण केले जाणार आहे. १ एप्रिल २२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहणार आहे.
महाराष्ट्रातील मुख्य अन्वेषक डॉ. स्मिता महाले, डॉ. राहुल गजभिये, डॉ. हिमत बावसकर, डॉ. सदानंद राऊत, डॉ. दिलीप पुंडे यांचा यात समावेश आहे. शासनाच्या आरोग्य विभागाचे याबाबत निर्देश आहेत. ग्रामीण भागात आज ही सर्प दंश रुग्णाबाबत अज्ञान, अंधश्रध्दा, गैरसमजुती आहेत. भोंदूगिरी, बाबांकडून छु मंतर करत इलाज करवून घेणाऱ्याची संख्याही मोठी असल्याने रुग्ण सर्पदंशाने गंभीर होऊन बळीही जातो. अशा रुग्णांवर उपचार करणे जोखमीचे ठरते. त्यामुळे सर्प दंश विषयक संशोधनात आशा सेविकांना सहकार्य करावे असे आवाहन डॉ दिलीप पुंडे यांनी केले आहे.
सर्पदंश विषयक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय धोरण ठरविण्यासाठी हे संशोधन फार उपयोगी असणार आहे. प्रशिक्षण शिबिरास डॉ. सुधाकर तहाडे, डॉ. रमेश गवाले, गटविकास अधिकारी तुकाराम भालकेसह या प्रकल्पाअंतर्गत मुखेड तालुक्यातील आशा सेविकांचे प्रशिक्षण डॉ. पुंडे तर्फे उपजिल्हा रुग्णालयात नुकतेच घेण्यात आले. ग्रामीण भागात सर्व्हे करण्यासाठी आशा सेविकांना प्रति अनेक जण उपस्थित होते. रुग्ण मानधन देण्यात येणार आहे.