
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- डॉ. भीमराव आंबेडकर यांचे जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कोरोनाच्या निर्बंधांमुळे दोन वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता आली नाही. पण यावर्षी राज्य सरकारकडून निर्बंध हटविण्यात आल्याने राज्यात ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन करण्यात येत आहे. तालुक्यातील गणेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन करण्यात आले.
यावेळी गणेगाव युवा नेते ग्रा.पं.स. उदयसिंह [सोनू राजे} जाधव,सरपंच समाधान कुंभार, भगवान बोंगाळे, उर्मिला चव्हाण, जयंती कमिटी अध्यक्ष नारायण चव्हाण, युवा नेते शिवसेना दत्तात्रय बापू खरात, युवा नेते वंचित बहुजन आघाडी, रशीद सय्यद, किशोर कोकाटे,दत्ता कोकाटे,भिकाजी शिंदे, ओंकार चव्हाण,विनायक शिंदे, रामा चव्हाण, दत्ता शिंदे, प्रमोद शिंदे, गुडा खरात, रामा खरात, सुरेश शिंदे, अजय शिंदे, विजय तुपसंदिर असे असंख्य नागरिक उपस्थिती होते.