
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड*
मसलगा :- कंधार तालुक्यातील मसलगा येथील तत्कालीन स्वत धान्य दुकानदार धान्य वाटप बरोबर करीत नसल्यामुळे कार्ड धारकांनी संबंधित उच्चस्तरीय अधिकार्यांस तक्रारी केल्यामुळे त्याचे दुकान निलंबित करण्यात आले होते ते मयत झाले आहेत. असे असताना गैर मार्गाने संबंधित अधिकार्यांच्या खोटा रिपोर्ट घेऊन, निलंबित झालेले स्वत धान्य दुकान मयत माने नियम बाह्य दुकान देण्यात आले.
अशा अधिकार्यांस निलंबित करून चुकीच्या मार्गाने देण्यात आलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावे अन्यथा असे नाही झाल्यास न्यायासाठी महाराष्ट्र दिनी १ मे रोजी तहसील कार्यालयासमोर १:३० वाजता बेमुदत सत्याग्रहास बसणार आहोत असे मसलगा येथील कार्डधारक बालाजी वडजे, आनंदा बोंडलवाड, नवनाथ गुंडवळ, आनंदा नारसनवाड, विलास वडजे, बाबाराव घोगरे यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर करून कळविले आहे.