
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- पुण्यातील खडकी बाजारात रात्री ८:०० च्या सुमारास आरोपी जावई अशोक गुलाब कुडले (वय ३८. रा. अपेक्स आर्चीस बोपोडी पुणे ) याने सासरे रमेश रामचंद्र उत्तरकर ( वय ६२ रा. खडकी, पुणे ) यांचा पोटात चाकू मारून धारदार शस्त्राने निघृण हत्या केली. व स्वतः हातात (चाकू) शास्त्र घेऊन खडकी पोलीस स्टेशनला हजर झाला.या प्रकरणी अरुण उत्तरकर ( वय. ६२ रा. महात्मा गांधी रोड. खडकी, पुणे ) यांनी खडकी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
पोलीस सूत्रानुसार आरोपी अशोक कुडले व त्याची पत्नीचे शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची केस चालू होती. सदर केसची तारीख कौटुंबिक न्यायालयात असल्याने आरोपी हा त्या ठिकाणी हजर असताना त्याच्या पत्नीस म्हणाला कि “तुझ्या बापामुळे आपल्या संसाराची वाट लागली. मी त्याला जिवंत सोडणार नाही”. असे म्हणून तो निघून गेला. त्यानंतर आरोपीने रात्री ८:०० च्या सुमारास मयत रमेश उत्तरकर वय ६५ हे दुकानाच्या बाहेर स्टूलवर बसले असताना त्याच्यावर धारदार शस्त्राने (चाकूने) सपासप वार करून गंभीर जखमी केले.
त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.दरम्यान आरोपी विरोधात खडकी पोलीस स्टेशनला १०६/२०२२, भादविक ३०२ म.पो. अधिनियम क.१३७,(१)सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधीक तपास खडकी पोलीस स्टेशनचे सहा. पो. उप निरीक्षक अमर कदम व त्यांचे सहकारी करीत आहे.