
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :- ठेकेदाराने तीन महिने वेतन न दिल्याने महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालय व थेरगाव रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले. मंगळवारी दोन्ही रुग्णालयांतील कर्मचार्यांनी काम बंद ठेवले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना उपचारासाठी वाट पाहत बसावे लागले. यानंतर सहाय्यक आरोग्य वैद्यकीय यांनी ठेकेदाराकडून त्वरित वेतन देण्यासाठी उपाय योजना करू असे आश्वासन आंदोलकांना दिले. यानंतर कर्मचार्यांनी आंदोलन मागे घेतले. वेतन थकविल्याबद्दल ठेकेदाराला नोटीस पाठविण्यात आली आहे.