
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी वाडा
मनिषा भालेराव
वाडा :- सन्माननीय मा. श्री. अनंताजी वनगा साहेब पालघर जिल्हा काँग्रेस कमिटी चे चिटणीसयांनी काही दिवसापूर्वी या शाळेला भेट दिली,त्यावेळी त्यांच्या बहुतेक विद्यार्थींच्या पायामध्ये चप्पला नसल्याचे निदर्शनास आले होते(दि. २७ एप्रिल )रोजी शाळेत भेट व गरजू विद्यार्थ्यांना चपल वाटप करण्यात आले काही दिवसांपूर्वी शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. सोनवणे सर यांच्या सोबत चर्चा केली की या लहान मुलांच्या पायात कडक उन्हामध्येही पायात चपला का नाहीत. तर सरांनी सांगितले की सदर ही सर्व मुलं गरीब घरची असल्यामुळे त्यांच्या आई- वडिलांना त्यांच्या सर्व गरजाची पूर्तता करणे तेव्हढे शक्य होतं नसते असे सांगितले.
तेव्हा आपल्या घरातील आपला माणूस सन्माननीय मा. श्री. अनंता जी वनगा साहेब यांनी वंगणपाडा शाळेच्या मुख्याध्यापक यांना शब्द दिला की या शाळेच्या सर्व मुलांना लवकरात लवकरच चपलांची पुर्तता करु असे सांगितले, आणि त्यांची पुर्तता म्हणून त्यांच्या मित्रपरिवारातील सदस्य सन्माननीय मा. श्री. चिरागजी पाटील साहेब आणि सोहमजी पाटील साहेब हे मुळचे आंबाडी येथील असून त्यांच्या कानावरती ही वस्तुस्थिती सांगितली असता कुठलाही विलंब न करता त्यांनीही या शाळेच्या विद्यार्थांना चपला देण्यास होकार दिला,म्हणून त्याची पुर्तता म्हणून आज रोजी वंगणपाडा येथील जि प शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्याथींनी व विद्यार्थ्यांना चपला देण्यात आल्या.
त्यावेळी प्रत्येक विद्यार्थी यांच्या पायामध्ये आपल्या घरातील आपला माणूस सन्माननीय मा. श्री. अनंताजी वनगा साहेब यांनी स्वतः विद्यार्थी यांच्या पायात चपला घातल्या हे बघून आम्हाला तसेच विद्यार्थी आणि शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी यांना सर्वांनाच आनंद वाटला आणि आपल्या घरातला आपला माणूस कसा आहे हे बघायला मिळाले. त्यावेळी काँग्रेस सेवादल चे वाडा तालुका अध्यक्ष सन्माननीय मा. श्री.जगदीशजी केणे साहेब,काँग्रेस आदिवासी सेलचे वाडा तालुका अध्यक्ष बाळा लहांगे साहेब,तसेच गारगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच सन्माननीय मा. श्री. सचिनजी पराड साहेब सुद्धा उपस्थिती होते. या मंगलमय कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय सोनवणे सर आणि सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन कमिटी वंगणपाडा यांनी केले होते. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.