
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- मुस्लिम समाज बांधवांचा सर्वाधिक मोठा असलेला रमजान ईद सण हा काही दिवसावर येऊन ठेपला आहे .यानिमित्ताने भूम येथे सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यावतीने मुस्लिम समाज बांधवांना विशेष कार्यक्रमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवार दिनांक 26 एप्रिल 2022 रोजी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक येथील मशिदीसमोर मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वपक्षीय यांच्यावतीने विशेष इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. 3 मे 2022 की रमजान ईद सण आहे . यानिमित्ताने रमजान ईद कालावधीत मुस्लिम समाज बांधव मनोभावे परमेश्वराची श्रद्धा करतात .
भक्तिभावाने पूजा करतात.यातून ते हिंदू-मुस्लीम ऐक्यतेची अपेक्षा करतात.देशातील प्रत्येक नागरिकांना आनंदी ठेवा . सुखी-समाधानी ठेवा . कोरोना सारखी संकटे येऊ देऊ नका . आपल्या आपल्या व्यवसाय उद्योग नोकरी शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये बरकती येऊ द्या .विशेष करून सर्वांना सुखी समाधानी निरोगी ठेवा यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. अशा सर्व मुस्लिम समाज बांधवांना भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आय.वंचित आघाडी, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते . या कार्यक्रमासाठी भूम -परंडा-वाशी माजी आमदार राहुल भैया मोटे यांची इफ्तार पार्टीला प्रमूरव उपस्थिती होती.
यावेळी रा. काँ. पार्टी भूम तालुकाध्यक्ष हनुमंत पाटोळे, आर डी सुळ, बाजार समिती सभापती रमेश मस्कर, शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, आबा मस्कर, राजाभाऊ माने, गणेश साठे, सत्येंद्र मस्कर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब क्षीरसागर, श्रीमंत यशवंत राजे थोरात, दिलीप गाढवे, दिलीप शाळू, काँग्रेस आय पक्षाचे भूम तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, भारतीय जनता पार्टीचे भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, तालुका सरचिटणीस संताजी सुपेकर, भूम शहराध्यक्ष शंकर खामकर .शिवसेना नेते सुनील माळी, ऑल इंडिया पॅंथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, या सर्वपक्षीय नेत्यांसह भूम शहरातील मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.