
दैनिक चालु वार्ता
खुलताबाद प्रतिनिधी
सविता पोळके
खुलताबाद :- दिनांक २७ खुलताबाद तालुक्या मध्ये नांद्रबाद येथे वर्ल्ड विजन संस्थेच्या शैक्षणिक वर्गाचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ल्ड विजन इंडिया क्षेत्रीय कार्यक्रम औरंगाबाद यांच्या वतीने खुलताबाद तालुक्यामध्ये १५ शैक्षणिक वर्ग सुरु करण्यात आले आहे. या वर्गात गावातील इयत्ता १ ते ७ विच्या अप्रगत मुलांना जास्तीचे वर्ग सुरु करून त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे आहे. त्यात विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ५८० मुलांचा समावेश आहे. यावेळी तेथील सरपंच इलियास सय्यद, भाजप तालुका अध्यक्ष प्रकाश वाकळे, प्रकल्प विकास अधिकारी शैलेश गोफने, शालोम थोरात,सिद्धार्थ जाधव, ज्ञानेश्वर देवकर शिक्षिका अनिता होळकर व ग्रामस्थ हजर होते.