
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी पुणे जिल्हा
गुणाजी मोरे
पुणे :- कोरोना काळात राज्य सरकारच्या मंत्र्यांनी लाखो रुपयांची बिलं राज्य सरकारच्या तिजोरीतून भरल्याचा उघड झालं आणि एकच टीका झाली. आता जसे नेते तसेच त्यांचे अनुयायी हे काही वेगळे सांगायला नको… पुणे महापालिकेतही शंभरच्यावर नगरसेवकांनी गेल्या दोन वर्षात वैद्यकीय उपचारांच्या बिलापोटी आठ कोटी रुपये वसूल केल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आजी-माजी नगरसेवकांनी 2021- 22 साली वैद्यकीय बिलापोटी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल चार कोटी वीस लाख रुपये तर 2020 – 21 या सालात 419 बिलांसाठी तब्बल चार कोटी 36 लाख 84 हजार 790 रुपये वसूल केले आहेत. याचा अर्थ कोरोनाच्या दोन वर्षात तब्बल साडेआठ कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम आजी-माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय बिलापोटी खर्च करण्यात आली आहे.