
दैनिक चालु वार्ता
मंठा प्रतिनिधि
सुशिल घायाळ
मंठा :- पोलीस ठाणे मंठा येथे सर्व धर्मीय जाती सलोखा रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
मागील काहि वर्षात कोरोणाच्या महामारीत कोणतेच सार्वजनिक कार्यक्रम घेता आले नाही.पण या वर्षी कोरोणाच्या परीस्थितीवर मात करण्यात काहि प्रमाणात यश आल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम,उत्सव, जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभुमीवर सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे.आणी या महिन्यात मुस्लिम बांधव कडाक्याच्या उन्हामध्ये पाण्याचा थेंब हि न पीता रोजे/उपवास धरतात अल्लाहाची इबादत/प्रार्थना करतात.
म्हणुन मुस्लिम बांधवाच्या रमजान महिन्यानिमित्त मंठा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संजयजी देशमुख यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजु मोरे साहेब उपविभागीय परतुर तसेच परतुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री श्यामसुंदर कोठाळे साहेब व शहरातील सर्व धर्मीय नागरिक तसेच उपनगराध्य, नगरसेवक, पञकार, डाॅक्टर,वकिल,व शहरातील प्रतिष्ठित नागरीक व सर्व पोलीस बांधव उपस्थित होत.