
दैनिक चालु वार्ता
चाकुर प्रतिनिधी
नवनाथ डिगोळे
चाकूर :- चाकूर तालुक्यातील मौजे मष्नेरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्या निमित्त ह.भ.प सखाराम महाराज पालमकर यांचे भागवत कथेचे प्रवचनाचा शेवटचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते तथा उद्योजक उत्तमजी वाघ हे सप्ताहास उपस्थित राहिले.यावेळी ह भ प सखाराम महाराज पालमकर यांचा सत्कार केला.
यावेळी गावक-यांच्या वतीने उत्तमजी वाघ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना महा आरतीचा मान मिळाला. यावेळी त्यांनी भागवत कथा सप्ताहाप्रसंगी प्रवचनाचा लाभ घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,अंकुश बोमदरे सह गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.