
दैनिक चालु वार्ता
जालना प्रतिनिधी
आकाश नामदेव माने
जालना :- देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधानांनी लसीकरण आणि खबरदारीबाबत चर्चा केली. याच बैठकीत मोदींनी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींवरून राज्यांना त्यांचा व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क नोव्हेंबर महिन्यात कमी केलं.
राज्य सरकारांना देखील आवाहन करण्यात आलं काही राज्यांनी कर कमी केले तर काही राज्यांनी कर कमी केले नाहीत. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगाना, आंध्र प्रदेश, केरळ, झारखंड, तामिळनाडू या राज्यांनी केंद्र सरकारचं ऐकलं नाही. त्यामुळं त्या राज्यातील नागरिकांना महाग पेट्रोल आणि डिझेल खरेदी करावं लागलं. नोव्हेंबरमध्ये जे करायचं होतं ते काम केंद्राने केलं. आता वॅट कमी करुन नागरिकांना दिलासा द्या, असं मोदी म्हणाले. गुजरात आणि कर्नाटक राज्यानं विक्रीकर कमी केल्याची माहिती देत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला