
दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल प्रतिनिधी
सुनिल पाटिल
म्हसावद प्रतिनिधी :- शहादा तालुक्यातील म्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावर असलेले लेगापाणी ते कोटबांधणी गावाजवड घाटाच्या वळण रस्त्यावर गुरांना वाचविण्याच्या प्रयत्न करताना शंभर फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या बाबत म्हासावद पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे . या बाबत पोलीस सूत्रानुसार माहिती अशी की मंगळवारी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान निवृत्ती शिवदास पाटील ( ४४ ) वनकर्मचारी वनकार्यालय तोरणमाळ ( ह. मु. श्रीहरिनगर,कांकरिया भवन मागे देवपूर धुळे ) हा सरकारी टपाल देणेकामी राणीपूर येथे स्वतःच्या गाडी क्र.( एम एच ०१ सी.व्ही.४०३१ ) ने येत असताना लेगापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटात अचानक गुरे आडवे आल्याने वाचविण्याचा वप्रयत्न केला .
मात्र गाडी शंभर फूट खोल दरीत कोसळल्याने तोंडाला , डोक्याला ,व छातीला गंबीर दुखापत झाली . त्यांना रुग्णवाहिका १०८ च्या साहाय्याने तातडीने म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांना डॉक्टरानी मयत घोषित केले वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए . आर . शेख यांनी शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . या बाबत म्हसावद पोलिसात संजय हिरामण पवार वनपाल तोरणमाळ यांनी फिर्याद दिल्यानुसार भादवी कलम ३०४(अ) २७९,३३७,३३८,४२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार फुलसिंग पटले हे करीत आहे .