
दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी
शाम पुणेकर
पुणे :– महापालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या नवीन विस्तारीत इमारतीमधील कार्यालयात अखेर नागरिकांना बसण्यासाठी लाकडी टेबल तसेच उन्हापासून बचावासाठी छत्र्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कारभार अद्याप सुधारण्यास तयार नाही. विशेष बाब म्हणजे नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या सहायक आयोग्य प्रमुख डॉ. मनिषा नाईक यांच्यासमोरच या ठिकाणी होत असलेल्या अडचणींचा पाढा नागरिकांनी वाचला.
त्यानंतर, डॉ. नाईक कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पाहणी करून तिथून निघून गेल्याचे पहायला मिळाले. शहरातील आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांसाठी महापालिकेकडून शहरी गरीब योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत 1 लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार दिले जातात. या योजनेचे सभासदस्त्व नुतनीकरण तसेच उपचाराचे पत्र देण्यासाठी महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या तळमजल्यावर हे नवे कार्यालय सुरू झाले. कर्मचारी वेळेवर येत नाहीत. लोकांशी उध्दटपणे वागतात.