
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा बसस्टँडमधील सीसीटीव्ही कॅमेरे म्हणजे असुन अडचण तर नसुन घोटाळा
लोहा : – दिवसेंदिवस लोहा शहरासह ग्रामीण भागात पण चोरीचे प्रमाण वाढले असून सध्या लगन सराईचा जोरात चालू असुन या लग्न सराईचा फायदा घेत लोहा बस स्थानकात प्रवासी महिला व पुरुष एस टी बसमध्ये चढत उतर असताना व बसस्थानकात दागिने, पर्स, पैसे, मोबाईल लांबवणे असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. या सर्व प्रकाराकडे लोहा पोलिस प्रशासन व लोहा बसस्थानकातीवल वाहतूक नियंत्रण कक्ष बघ्याची भूमिका घेत असल्याचं निदर्शनास येत असुन सुरक्षा रक्षक हे बसस्थानकामध्ये असुन नसल्यासारखे व पगारी पुरतेच मर्यादित दिसत असुन लोहा बसस्थानक चोरट्यांचा अड्डा बनत असल्याचे दिसत आहे.
लोहा बसस्थानकात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असुन हे कॅमेरे म्हणजे असुन अडचण तर नसुन घोटाळा अशी स्थिती दिसत आहे. लोहा बसस्थानकामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोर्यांमध्ये वाढ होत आहे. बसमध्ये चढताना किंवा उतरताना दागिने, पैसे, मोबाईल लंपास करणे असे प्रकार वाढत आहेत. या घटनांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. लोहा बसस्थानकात बुधवारी पांगरी येथील एका महिलेची सोन्याची एका तोळ्याची पोत चोरट्यांनी पळवली त्यांच्या कुटुंबियांनी बसस्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज वाहतुक नियंत्रण कक्षाकडे मागीतले असता सदरील कर्मचाऱ्यांनी त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली असुन या प्रकारामध्ये कर्मचारी पण सहभागी असल्याचा आरोप सदरील व्यक्तीनी केला असुन चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे लोहा बसस्थानक चोरांचे माहेरघर असल्याचे चित्र दिसुन येत आहे.