
दैनिक चालु वार्ता
तालुका प्रतिनिधी
नवनाथ यादव
भूम :- तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी भरत भीमराव पाटील यांच्या गट नंबर ४०१ मध्ये सुमारे ३००० कडब्याची गंज होती.सदरील गंज जवळ उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. दिनांक २७ एप्रिल च्या दरम्यान दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास, जोराचा वारा वाहू लागल्याने उच्च दाबाच्या विद्युत तारांची स्पार्किंग होऊन बांधावर ठिणगी पडली आणी, बांधावरील गवताने पेट घेतला आणि तेथून नजिक असलेली भरत पाटील यांची कडब्याची गंज डोळ्यांदेखत जळून खाक झाली,यात त्यांचे जवळपास ६० ते ७० हजारांपर्यंत नुकसान झाले आहे,परंतु अद्याप कोणताही शासकीय कर्मचारी घटनास्थळी भेट देण्यास किंवा पंचनामा करण्यास आले नसल्याचे यावेळी भरत पाटील यांनी बोलताना सांगितले तर शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भरत पाटील यांच्या वतीने करण्यात येत आहे.