दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई रजनीताई पाटील जिल्ह्यात राहात नाहीत फक्त टूरवर येतात असा आरोप काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी खासदार रजनीताई पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे काँग्रेसचे राजकिशोर मोदी यांना काही दिवसांमध्येच जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते त्यानंतर त्यानंतर नुकतेच खासदार पदी रजनीताई पाटील यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर राजकिशोर मोदी हे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती यानंतर आज माध्यमांनी त्यांना विचारले आपण काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे समजते असे खरे आहे का? या प्रश्नावर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले रजनीताई पाटील यांना खासदारकी मिळाली अभिनंदन मात्र त्या जिल्ह्यात कुठे राहतात? जिल्ह्यात त्या फक्त टूरवर येतात असा घणाघाती टीका काँग्रेसचे माजी •जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली