
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी आर्णी
श्री,रमेश राठोड
आर्णी :- आर्णि तालुक्यातील असलेल्या मौजा सदोबा सावळी येथे दि.२९/४/२०२२ शुक्रवारला वेळ १०.३० वाजता. महावितरण कंपनी (MSEB)विरोधात भव्य आंदोलन करण्यात येणार आहे,विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सावळी सदोबा परिसरातील मौजा उमरी (कोपेश्वर) येथील शेतकरी संदीप उपलेंचवार आणि शेतमजूर प्रमोद नेवारे यांच्या अंगावर ३३केव्ही विद्युत वाहिनीच्या जिवंत ताराचा झटका लागून अपघात झाला होता. हा अपघात एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की,या अपघातामध्ये प्रमोद नेवारे या गरीब तरुणांचा एक हात तोडण्यात आलेला असून,दुसऱ्या हाताची दोन्ही बोटे सुद्धा तोडण्यात आली आहे.
त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, या घटनेला आज २ महिने लोटूनही विज वितरण कंपनीकडून दोन्ही अपघातग्रस्त युवकांना कुठलाही मोबदला मिळाला नसून,विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून अपघात ग्रस्ताची साधी विचारपूस देखील केली नाहीत,अपघातग्रस्त युवकावर खूप मोठा अन्याय झालेला आहे. आणि याच अन्यायाच्या विरोधात,या दोन्ही युवकांना न्याय मिळवून देण्यासाठी दि-२९/४/२२ रोज शुक्रवारला सदोबा सावळी येथे भव्य आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.