
दैनिक चालु वार्ता
भोर प्रतिनिधि
जीवन सोनवणे
भोर :- प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत भोर तालुक्यांतर्गत भांबवडे फाटा ते भांबवडे गाव या रस्त्याचे काम अल्पावधीत उखडले. त्यामुळे या कामवर सर्वत्र शंका उपस्थित होताना दिसते. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत तयार केलेले रस्ते दोण महिन्यतच उखडले आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामांचा मुद्दा येथे आपल्याला पहायला मिळतो . विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वीच हा रस्ता तयार करण्यात आला असून त्यावर खड्डेच खड्डे दिसत आहेत. यात अधिकरी सुस्त ठेकेदार मस्त पन गावकरी मात्र त्रासात दिसत आहेत.
यांनी पीएनजेएसवाय अंतर्गत केलेले रस्ते देखभाल दुरुस्तीच्या ५ वर्षांच्या कालमर्यादेत येतात. मात्र, या रस्त्यांना पाच वर्षांचा अवधी होण्यापूर्वीच जर रस्ते खराब होत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे . ठेकेदारांना फोन केला असता ते नेहमिच आउटॉफ कवरेज असतात. सदर काम अतिशय थातूरमातूर पद्धतीने करण्यात येत असल्याने रस्ता बांधकाम सुद्धा दर्जाहीन होऊन रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता आहे तसेच खडीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर होणारे मजबुतीकरणाचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे होऊन रस्ता अल्पावधीतच खराब होणार आहे याबाबत परिसरातील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.
संबंधित कामावर शाखा अभियंता यांचे पूर्णतः दुर्लक्ष असून कामाची साधी पाहणी सुद्धा केलेली नाही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम ज्या कंत्राटदाराला देण्यात आले त्या कंत्राटदाराचे तालुक्यातील इतर कामेही मोठ्या प्रमाणात बोगस असून कामात गैरप्रकार आहे त्यामुळे सदर कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे तसेच सदर कामाचा दर्जा सुधारावा अशी ही मागणी नागरिकांची आहे.