दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी अरुण भोई
महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण २०२० अंतर्गत दौंड तालुक्यातील अतिभारीत रोहीत्रांवरील भार कमी करण्याकरिता रोहित्र क्षमता वाढ, अतिरिक्त २६५ रोहित्रांची उभारणी, भार व्यवस्थापन, कृषी प्रवण उपकेंद्रामध्ये स्वयंचलित कॅपेसिटर बँक कार्यान्वित करणे, कृषी वाहिन्यांवर योग्य क्षमतेचे कॅपेसिटर बसविणे, नवीन सबस्टेशन, विविध सबस्टेशनमध्ये पॉवर टी / एफ वाढवणे आदी कामांसाठी तसेच लघुदाब वाहिनी व उच्चदाब वाहिनीद्वारे (HVDS) प्रलंबित कृषी पंपांच्या नवीन वीज जोडणी बाबत आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करत आहोत.
यासंदर्भांत आज महावितरणचे केडगाव उपविभाग कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र एडके यांच्या कार्यालयात आढावा बैठक पार पडली यावेळी महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण २०२० अंतर्गत दौंड तालुक्यात सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला तसेच जिल्हा नियोजन मंडळाद्वारे नवीन रोहित्रांच्या उभारणीसाठी आपण केलेल्या मागण्यांवरील कार्यवाही बाबत चर्चा केली.
भारनियमन करताना कृषी पंपांची तसेच औद्योगिक गरज लक्षात घेत योग्य नियोजन करावे, सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण करावीत आदी सूचना केल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. माऊली आण्णा ताकवणे, भीमा पाटसचे माजी संचालक श्री. किरण देशमुख, सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री. किशोर शिंदे, सहाय्यक अभियंता श्री. पराग सुलाखे व परिसरातील सहकारी उपस्थित होते.