दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड
कंधार:-नांदेड जिल्हा परिषद स्थापनेला १ मे २०२२ रोजी ६० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत हिरक महोत्सव समारंभात कंधार तालुक्यातील देवईचीवाडी येथील ग्रामसेवक निळकंठ मुगावे व सरपंच चंद्रकला केंद्रे यांचा ग्रामपंचायतीस ISO नांमाकंन मिळवुन दिल्याबद्दल व स्मार्ट ग्राम स्पर्धेत उत्तम काम,घरकुलाचे १००% ऊदिष्टे पूर्ण करणे, ग्रामपंचायतीचे उत्कृष्ट संगनीकृत रेकॉर्ड, १००% शौचालय बांधकाम व वापर, वृक्षलागवड इ. ऊल्लेखनीय काम केल्या बद्दल मा.ना.पालकमंत्री आशोकराव चव्हाण साहेब व जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.