दैनिक चालू वार्ता पेठवडज प्रतिनिधी-बाजीराव गायकवाड
मसलगा :- मसलगा येथील नागरिकांनी कंधार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. कंधारचे तहसीलदार श्री. मुंडे साहेब यांनी उपोषणाच्या ठिकाणी येऊन मयत वारसाच्या नावाने केलेला आदेश चौकशी करून रद्द करण्यात येईल अशी लेखी व तोंडी स्वरूपात नोटीस दिली, मार्गदर्शन केले व या नोटिस वरुन आमरण उपोषण माघार घेण्यात आले. उपस्थित बालाजी पाटील मसलगेकर, अविनाश पाटील वडजे, शिवाजी बोलनवाड,तहसीलदार साहेबांच्या शब्दाला मान देऊन आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.