दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी-दशरथ आंबेकर
-इस्लापूर शहरात महात्मा बसवेश्वर जयंती थाटामाटात मोठया उत्साहात साजरी करण्यातआली.जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची इस्लापूर शहरामध्ये शिवाजी चौकात व ग्रामपंचायत कार्यालय मध्ये मोठ्या उत्सवामध्ये जयंती साजरी करण्यातआली.जयंतीचे औचित्य साधून मत व्यक्त करत असताना शहरातील तरुणांनी खऱ्या अर्थाने व्यसनापासुन पासून दूर राहावे व सर्व समाजातील प्रत्येक घटकात जातीय सलोखा राखून कार्यकर्त्यांनी एकोप्याने राहावे महात्मा बसवेश्वर यांचे विचार आत्मसात करावेअसे मत या प्रसंगी माजी पं.स.सदस्य तुकाराम बोनगीर यांनी बोलतांना व्यक्त केले.याप्रसंगी इस्लापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथशेवाळे, उपनिरीक्षक योगेश बोधगिरे , वैद्यकीयअधिकारी प्रदीप शिंदे,येथील सरपंच सौ.शारदा शिनगारे,उपसरपंच निर्मलाताई दुरपडे,ग्रा.प.सदस्य चंद्रकांत पाकलवाड,प्रशांत डांगे,नारायण दंतलवाड,उदय पाटील,दत्ता बेहेरे संग्राम बिरकुले,उत्तम चव्हाण, देविदास पळसपूरे,बालाजी दुरपडे,श्रीरंग पवार,प्रकाश दंडे,परमेश्वर पेशवे,मारुती शेळके, ईश्वर जाधव,राजेश गायकवाड, बालाजी जाधव,राजूआंबटवाड, नारायण सिंनगारे,बंडू पाटील,प्रीतम शेळके,बालाजी आलेवार,बंटीआडे,स्वप्निल गरडे, गजानन वानोळे,सत्येश्वर पेशवे, बालाजी पेशवे,विकास माहूरकर, विष्णू बैलवाड,दत्ताजी गडलवाड, भगवान डांगे,प्रभाकर बैनवाड, परमेश्वर भुरे,शुभम पेशवे, यांच्यासह विविध समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शवली.विशेषता या कार्यक्रमाच्या प्रसंगी धावत्या रेल्वेमध्ये एका गरोदर महिलेची प्रसुती करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.प्रदीप शिंदे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.