दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- गेल्या दोन महिन्यांपासून जव्हार नगर परिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने अनेक विकासकामे प्रलंबित राहिली आहेत.प्रशासकीय बाबींच्या पूर्ततेसाठी जव्हार नगर परिषदेची विकासकामे पूर्ण करण्यासाठी डहाणू येथील मुख्याधिकारी वैभव आवारे यांना जव्हार नगर परिषदेचा कार्यभार देण्यात आला आहे.
जव्हार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार हा मोखाडा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे देण्यात आला होता.मात्र ऋषिकेश पाटील हे कोरोणाच्या कारणावरून एक महिन्याच्या रजेवर गेल्यामुळे पुन्हा जव्हार नगर परिषदेचा अतिरिक्त कार्यभार हा डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांच्या कडे देण्यात आला आहे.